खंडेरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात,दोघांचा मृत्यू तर 14 जण जखमी
आय मिरर
सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या छोटा हत्तीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 14 जण गंभीर जखमी झालेत.देवदर्शना ला जाताना पहाटे अडीच वाजताच्या सुमारास अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती आणि टाटा कंपनीचा टेम्पो यांच्यात अपघात झाला.यात दोघांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झालेत.हि घटना बेलसर वाघापूर रस्त्यावर घडली आहे.
छोटा हत्ती मधील चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे, वय 35 व आशाबाई बाळकृष्ण जरे वय 50 रा जरेवाडी ता खेड जि पुणे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील जरेवाडी येथून MH 14 LL 1498 क्रमांकाच्या अशोक लेलँड कंपनीच्या छोटा हत्ती मधून हे सर्व भाविक अशोक लेलँड छोटा हत्तीने जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्री निघाले होते.पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वाघापूर बेलसर रस्त्यावर समोरून येणाऱ्या टाटा टेम्पो गाडीने या अशोक लेलँड च्या छोट्या हत्तीला जोरात धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अशोक लेलँड मधिक भाविक जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला या दोघांचा मृत्यू झाला तर मंगल तोत्रे,ज्ञानेश्वर तोत्रे ,तानाजी तोत्रे ,अनुष्का तोत्रे,राहुल तोत्रे,विलास तोत्रे,बाळू तोत्रे,अश्विनी तोत्रे,तनिष्का तोत्रे,ओंकार करंडे,मिरा करंडे,मंगल जरे,बाबाजी करंडे,जितेंद्र तोत्रे, हे जखमी झाले आहेत.जखमींना जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत
What's Your Reaction?