लोकसभेच्या निकालानंतर हर्षवर्धन पाटील अलर्ट, इंदापूर विधानसभेत जनतेशी असलेला संपर्क वाढवण्याचं पदाधिकाऱ्यांना आवाहन

Jun 14, 2024 - 19:22
 0  803
लोकसभेच्या निकालानंतर हर्षवर्धन पाटील अलर्ट, इंदापूर विधानसभेत जनतेशी असलेला संपर्क वाढवण्याचं पदाधिकाऱ्यांना आवाहन

आय मिरर

नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकालानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अलर्ट झालेत.आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हर्षवर्धन पाटलांनी मतदारसंघात लक्ष घातलंय.भाजप पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेशी असलेला संपर्क वाढवावा असं आवाहन पाटील यांनी बैठकीत केलयं.

लोकसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभेतून सुप्रिया सुळेंना 25 हजार हून अधिकची आघाडी मिळाली. पुढील तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि यामध्ये आता गाफील न राहता आत्तापासूनच हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष घातलयं.

गुरुवारी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात बैठक बोलावत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.सर्वसामान्य जनतेला नेहमीच मदत करण्याची भूमिका ठेवा, त्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा, नवीन मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष द्या. तसेच सतत इतरांना मान-सन्मान द्या त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांनी जनतेशी असलेला संपर्क वाढवावा, असं आवाहन ही हर्षवर्धन पाटील यांनी केले.               

शिवाय देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपची मजबूत सत्ता आली आहे, त्याबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन ही केले.          

प्रत्येक निवडणुकीला वेगळे संदर्भ असतात. मतदारांचा अभ्यास करा व मानसिकता लक्षात घ्या. लवकरच गावोगावच्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या बैठकीला इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, शहराध्यक्ष पांडुरंग शिंदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या तरी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी विधानसभेला स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. राज्यात सध्या भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना यांसह काही मित्र पक्षांची महायुती आहे. मात्र पुढील तीन ते चार महिन्यात अनेक मोठे निर्णय होऊ शकतात.जर स्वबळावर लढण्याचा नारा दिला तर इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुध्द भारतीय जनता पार्टी यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळेल. तर कालच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी इंदापूर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला.मला पुढील चार ते सहा महिन्यात महाराष्ट्राचं सरकार बदलायचं अशी घोषणाच पवारांनी केली.त्यामुळे इंदापूर विधानसभेतही शरद पवार कुठेही कमी पडणार नाही असं चित्र सध्या तरी पहायला मिळतयं.तर बारामती लोकसभेत मिळालेला अनपेक्षित निकाल पाहता आत्तापासूनच हर्षवर्धन पाटील यांनी ताकद लावलीय. मात्र यात दत्तात्रय भरणे ही कुठे कमी नसतील हेही तितकच खरं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow