सुनेत्रा पराभूत झाली विधानसभेला मी जिंकलो,मग लोकांचा कौल कसा बदलला हे विचारू का? - अजित पवार
आय मिरर
लोकसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधाऱ्यांच्याविरोधात कौल दिला तर विधानसभेला जनतेने आम्हाला पसंती दिली. बारामतीत माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना ४८ हजार मतांनी पिछाडी होती, ती निवडणुकीत पराभूत झाली. पण विधानसभेला मी स्वत: उमेदवार होतो. तिथे ४८ हजार मते ओलांडून मी १ लाखाच्या मताधिक्याने जिंकलो. शेवटी निवडणुकीत कुणाला कौल द्यायचा, याचा सर्वस्वी अधिकार जनतेला असतो. त्यामुळे आपण त्यांच्यावर कसे काय प्रश्नचिन्ह उपस्थित करणार? असे सवाल अजित पवार यांनी विचारले. अजित पवार यांनी उपोषणकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.
लोकशाही आणि राज्यघटनेची थट्टा होत असल्याचे सांगत ज्येष्ठ कृतिशील विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. शनिवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. बाबा आढाव यांच्या प्रत्येक आक्षेपांवर अजित पवार यांनी मते मांडली.
अजित पवार म्हणाले, दोन दिवसांपासून बाबा उपोषणाला बसले आहेत म्हणून त्यांना भेटायला आलो. संविधानाने आपले मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार दिला आहे. ईव्हीएम, बॅलेट पेपर या गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्या बाबतीत काही निर्णय घेतलेले आहेत. लोकसभेला महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या, तेव्हा ईव्हीएमच्या बाबतीत कुणीच काही बोलले नाही. बारामतीत ४८ हजारांनी माझ्या उमेदवाराचा पराभव झाला. माझा पाच महिन्यानंतर लोकसभेत झालेला पराभव मी विधानसभेला भरून काढला. शेवटी लोकांचे जनमत आहे, ते पाच महिन्यांनी बदलले ते मान्य करायला हवं, असे ते म्हणाले.
आपण म्हणताहेत पैशाचा वारेमाप वापर झाला तसं झालं असेल तर यंत्रणा आहेत . आपल्याकडे परराज्यासारखे बूथ कॅप्चेरिंग होत नाही. योजनेचे अमिष देण्यासंदर्भात तुम्ही म्हटलात. लोकसभेला आमचा दारुण पराभव झाला, त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि योजना आणली. सगळ्या राज्यांनी काही ना काही योजना आणल्या. कुणी पाणी-वीज मोफत दिल्या. कुणी प्रवास मोफत दिला आपण महिलांना मदत दिली, बिघडले कुठे? मग इतर राज्यांनी दिले तर ते प्रलोभन नाही का? असा उलटसवाल अजित पवार यांनी विचारला.
तुमच्या मागणीनुसार अडाणीच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे हे मान्य. आमच्याकडेही सगळ्या आक्षेपांना उत्तरं आहेत. दिल्लीला जाऊन संसदीय कामकाज मंत्र्यांना विनंती करतो, असे मुद्दे चर्चेला घ्या. परंतु ईव्हीएमचा मु्द्द्यावर तक्रारी करत बसू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सगळ्यांना वाटतं बाळासाहेब थोरात कसे पडले ? कराडवाले पृथ्वीराज चव्हाण कसे पडले? आता पडले तर पडले, असेही अजित पवार म्हणाले.
आमची हात जोडून पाया पडून विनंती आहे बाबांनी आंदोलन थांबवावं. बॅलटपेपरवर मतदान घ्यायला आमची हरकत नाही पण तो निर्णय आमच्या हातात नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचे संबोधन ऐकल्यानंतर आमचे आंदोलन चिरडू नका एवढीच विनंती असल्याचे बाबा आढाव म्हणाले.
What's Your Reaction?