एकीकडे प्रवीण मानेंच्या घरवापसीचे संकेत दुसरीकडे आ.भरणेंवर सडकून टीका,महारुद्र पाटील काय म्हणाले…

आय मिरर
लोकसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि इंदापूरच्या राजकारणातील युवा नेते प्रवीण माने यांच्यावरती फार मोठं प्रेशर टाकलं होतं म्हणून ते अजित पवार गटात गेले असा गोफ्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केलाय.ते इंदापूर मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्या पक्ष ज्याला कोणाला विधानसभेचे तिकीट देईल त्याच आम्ही काम करू त्यामुळे प्रवीण मानेंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं महारुद्र पाटील यांनी म्हटलंय.
प्रवीण माने यांना सुप्रिया सुळे यांविरोधात काम करायचे असते तर ते गाव भेट दौऱ्यात सहभागी झाले नसते,लोकसभेच्या निवडणुकी वेळी सुप्रिया सुळेंसाठी प्रवीण मानेंनी इंदापूर तालुक्यातील साठ-सत्तर गावांमध्ये दौरा केला होता त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही म्हणत प्रवीण माने यांचे शरद पवार गटात घरवापसीचे संकेत दिले आहेत.
विद्यमान आमदारांमुळे इंदापूरचं नांव राज्यात बदनाम झालं...
इंदापूरच्या विद्यमान आमदारांमुळे संपूर्ण राज्यात इंदापूरचं नांव बदनाम झालं आहे.पाहुण्यारावळ्यांकडे गेलो तरी लोक मलिदा गँग बद्दल विचारतात, याचा परिणाम लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला देखील भोगावा लागला असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेश (शरद पवार) गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांवर नांव न घेता टीका केलीय.
What's Your Reaction?






