Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; विखेंचा खळबळजनक दावा
![Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; विखेंचा खळबळजनक दावा](https://imirror.digital/uploads/images/202502/image_870x_67aaa803be78d.jpg)
आय मिरर
हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचा रविवारी (दि. 10) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे खळबळ जनक विधान केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पुढील दीड वर्षात दूध उत्पादनाचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अमूलचा समूह राज्यातून 35 ते 40 लाख लिटर दूध खरेदी करतो. लोक म्हणतात गुजरातचे दूध बंद करा. मात्र, अमूलचा समुह आपल्याकडून दूध विकत घेतो म्हणून दूध संकलन टिकून आहे. आता दुधापासून पनीर तयार होत नाही. हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते. दूधपासून बनलेले पनीर खरेदी करा, असे त्यांनी म्हटले.
मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक गुंतवणूक शेतीत...
मी कृषी मंत्री असताना पहिला कृषि महोत्सव सुरू झाला. कृषि महोत्सव सुरू करण्याचे भाग्य मला लाभले. शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. सलग 14 वर्षांपासून महोत्सव सुरू आहे. राज्यातील शेतकरी येथे उपस्थित आहेत. बदलते हवामान, ग्लोबल वार्मिंगचा फटका शेतीला बसतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा आपण देत आहोत. संवेदनशीलपणे काम हे सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक गुंतवणूक शेतीत केली जात आहे असे त्यांनी म्हटले.
What's Your Reaction?
![like](https://imirror.digital/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://imirror.digital/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://imirror.digital/assets/img/reactions/love.png)
![funny](https://imirror.digital/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://imirror.digital/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://imirror.digital/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://imirror.digital/assets/img/reactions/wow.png)