नितेश राणेंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे म्हणतात'त्या व्यक्तीचं साधारण ज्ञान काय?'

आय मिरर
नीलम गोऱ्हे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाना उत्तर दिलंय.गोरे म्हणल्या जो खटला सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे त्यावर कोणी भाष्य करीत असेल तर मला त्याबद्दल दखल घ्यावी असं मला वाटतं नाही..त्या व्यक्तीचे काय साधारण ज्ञान काय आहे. ते कायद्याचे अभ्यासक आहेत का? ते पोलीस डिपार्मेंटचे आहेत का? या वरून आपण ठरवत असतो.मला याबाबत काहीच प्रतिकिया द्यायची नाही असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.त्या पंढरपूर मध्ये बोलत होत्या.
पुण्यातील दंगल घडविण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असल्याचा आराेप मंगळवारी आमदार नितेश राणे यांनी केला हाेता. हा आराेप करताना राणेंनी माजी पाेलीस आयुक्त मीरा बाेरवणकर यांच्या पत्रकार परिषदेतील मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे यांच्या विराेधातील दंगलीबाबतचे पूरावे हाेते याचा दाखला दिला हाेता.
पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे आणि निलम गोरे यांच्या पैकी कोण पहिल्या मुख्यमंत्री व्हावं यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.ज्या लोकांना आपल्या पक्षात स्थान नाही असे लोक महिला मुख्यमंत्री मुद्दा उपस्थिती करीत आहेत अशी मला शंका वाटतीय. त्यांनी स्वतःच्या कामाच्या आधारे स्थान मिळवावे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगल काम केलं आहे.
What's Your Reaction?






