कार अपघातात वृद्ध आईसह मुलगा ठार,साकोलीच्या उड्डाण पुलावरील दुर्घटना

Jun 30, 2024 - 06:24
Jun 30, 2024 - 06:32
 0  278
कार अपघातात वृद्ध आईसह मुलगा ठार,साकोलीच्या उड्डाण पुलावरील दुर्घटना

आय मिरर

रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने डिवायडरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू झालाय. तर, 16 वर्षीय मुलगा जखमी झाला.

ही घटना साकोली येथील उड्डाण पुलावर २९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. कांता गजभये (७२) आणि डॉक्टर सुफलकुमार गजभये (५७) असे या अपघातात मृत पावलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर, शिवान गजभये (१६) असे जखमी मुलाचे नावं असून त्याच्यावर साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 

रायपूर येथील प्रसिद्ध डॉ.सफलकुमार गजभये यांच्या नातेसंबंधातील विवाह समारंभ नागपूरला असल्याने ते आई आणि त्यांचा मुलगा शिवान यांच्यासह कार क्रमांक सी जी ०४ एच जे ४४८४ नं रायपूर इथून नागपूरकडे निघाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow