बिग ब्रेकींग | रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडेंना पोलिसांनी केली अटक

Jul 1, 2024 - 07:14
Jul 1, 2024 - 07:27
 0  1822
बिग ब्रेकींग | रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडेंना पोलिसांनी केली अटक

आय मिरर

रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडेंना पोलिसांनी अटक केली आहे.सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला होता.रणजित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार झाला होता.रणजित निंबाळकर यांवर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार होते.

शुक्रवारी पहाटे रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्यानंतर रविवारी गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता.याप्रकरणी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय……

आरोपी गौतम काकडे यांना रणजीत निंबाळकर यांनी 'सुंदर' नावाचा बैल ३७ लाख रुपयांना विकला होता. त्यानंतर पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम २७ जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबूत येथे त्यांच्या घरी बोलवले होते. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजीत निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची नऊ महिन्यांची मुलगी अंकुरण हे निंबुत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते.याच वेळी व्यवहाराचे रुपांतर वादात झालं आणि वाद निकोपाला गेला.एकतर व्यवहार पुरा करा किंवा तुमचा अँडव्हांस परत देतो मला माझा बैल परत द्या म्हणून रणजित निंबाळकर हे तिथून फिरले.याच वेळी गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. उपचारदरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला. यानंतर रणजीत निंबाळकर यांच्या नातेवाईकांसह हजारो समर्थकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यावरती घेराव घातला, आरोपी गौतम काकडे याला तात्काळ अटक करावी कठोरातील कठोर शिक्षा द्यावी याशिवाय सुंदर नावाचा बैल मूळ मालकाला परत करावा अशी मागणी लावून धरली होती. यावेळी संतप्त जमावाची पोलिसांनी समजूत काढत आम्ही लवकरात लवकर गौतम काकडे याला अटक करू पोलीस त्याच्या मागावर आहेत असं आश्वासन दिलं होतं,पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत,गौतम काकडे याचा शोध घेतला जातोय असं पोलिसांनी सांगितल्यानंतर हा जमाव शांत झाला होता. दुसरीकडे गौतम काकडे याला जर अटक झाली नाही तर मी आत्मदहन करेन असा इशारा रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी पोलिसांना दिला होता.तत्पूर्वीच पोलिसांनी रविवारी गौतम काकडे याला अटक केली आहे.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे याला यापूर्वीच अटक केली आहे तर गौतम काकडे यालाही आता अटक करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow