पदभार स्वीकारताच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गाठलं इंदापूर पोलीस ठाणं , वाचा सविस्तर

May 18, 2025 - 18:28
 0  803
पदभार स्वीकारताच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल  यांनी गाठलं इंदापूर पोलीस ठाणं , वाचा सविस्तर

आय मिरर 

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने बदली झाल्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलीस खात्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार संदीपसिंह गिल यांनी स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आज त्यांनी बारामतीत सर्वप्रथम उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांचा स्वागत केलं. एवढ्या दोघांमध्ये पोलीस खात्यातील कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा ही झाली. 

यानंतर संदीपसिंह गिल यांनी आपला ताफा इंदापूरच्या दिशेने वळवला आणि इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड देखील उपस्थित होते. इंदापूर पोलीस ठाण्याकडून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांचे स्वागत केले.यादरम्यान इंदापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

यादरम्यान पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि इंदापूर पोलीस यांच्यामध्ये चर्चा झाली. गिल यांनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी गिल यांना कामकाजाबाबत माहिती दिली. साधक-बाधक चर्चा मध्ये गिल यांनी इंदापूर पोलिसांना कायदा सुव्यवस्थेबाबत आणि गुन्हेगारी बाबत काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. एकूणच इंदापूर पोलिसांच्या कामकाजबाबत पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी समाधान व्यक्त केल आहे.

यानंतर इंदापूर तालुक्यात नव्यानेच होत असलेल्या नरसिंह पूर पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी भेट दिली. त्या ठिकाणी नव्याने बांधलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीची गिल यांनी पाहणी केली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow