पडळकर घटनेच्या निषेधार्थ आज पुण्याच्या इंदापुरात कडकडीत बंद

Dec 11, 2023 - 09:56
Dec 11, 2023 - 14:53
 0  431
पडळकर घटनेच्या निषेधार्थ आज पुण्याच्या इंदापुरात कडकडीत बंद

आय मिरर

शनिवारी पुण्याच्या इंदापूरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे इंदापूर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या दूध आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्याच ठिकाणी सुरू असलेल्या सखल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वरती चप्पल फेक करण्याचा प्रयत्न केला.गोपीचंद पडळकर गो बॅक अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी दि.११ डिसेंबर रोजी संपूर्ण इंदापूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. ओबीसी बांधवांसह गोपीचंद पडळकर समर्थकांनी या बंदच आवाहन केलेल आहे. या बंदला शहरातील व्यापारी वर्गासह सर्वांनी पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.इंदापुरात ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर दूध दर प्रश्नी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याला भेटावयास गेल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला होता.पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी त्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करावी अशी मागणी ओबीसी समाज बांधवांसह गोपीचंद पडळकर समर्थकांनी रास्ता रोको करत केली होती. आता पोलीसांनी कारवाईला सुरवात केली आहे.इंदापूर पोलीसात मराठा समाजाच्या अज्ञात 10 ते 15 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते - आमदार पडळकर

या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी यावर फेसबुक च्या माध्यमातून व्हिडिओ पोस्ट करीत स्पष्टीकरण दिलं होत.इंदापूरच्या सभेनंतर दूधदर आंदोलनास जाताना हा भेकड प्रकार घडला. परत या नौटंकीबाजांनी हे माझ्याच कार्यकर्त्यांनी केलं असे सांगितले. मी संयमाची भूमिका घेतली अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते. ओबीसी बांधवांनो याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये.असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow