दूध संघातील सुपरवायझरनं वाढदिवशीचं संपवलं जीवन; चिठ्ठीत लिहिलं…
सावर्डे (ता. हातकणंगले) येथील रणजित बाळासो पाटील (वय ३५) याने वाढदिवसादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली.पाटील गोकुळ दूध संघात सुपरवायझर म्हणून कामास होता. सोमवारी त्यांचा वाढदिवस होता. दिवसभर ते शेतातील काम करत होते.
कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) रात्री उघडकीस आली.
रणजित पाटील गोकुळ दूध संघात सुपरवायझर म्हणून कामास होता. सोमवारी त्यांचा वाढदिवस होता. दिवसभर ते शेतातील काम करत होते. सायंकाळी सहा वाजता कामास जातो, असे सांगून ते बाहेर पडले. सहानंतर घरच्यांनी त्यांना फोनवर संपर्क केला; परंतु त्यांचा संपर्क होत नव्हता. यामुळे घरच्यांची चिंता वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली.
शेतात पाहण्यासाठी गेले असता त्याने शेतातील झाडास गळफास लावल्याचे उघडकीस आले. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कर्जबाजारी झाल्याचा उल्लेख आहे. याशिवाय माझ्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबतची वर्दी योगेश पाटील यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली. सहायक फौजदार गावडे तपास करत आहेत.
What's Your Reaction?