आ.दत्तात्रय भरणे यांनी केला बेलवाडीस 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर - तालुकाध्यक्ष अॅड.शुभम निंबाळकर यांची माहिती
आय मिरर
बेलवाडी ता.इंदापूर या गावास इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 1 कोटी २० लाख रुपयाचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर केल्याची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.शुभम निंबाळकर यांनी दिली.
बेलवाडी गावातील उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांनी विविध विकास कामांच्या निधीसाठी आमदार भरणे यांची भरणेवाडी येथे भेट घेतली. असता आमदार भरणे यांनी गावातील विकास कामाकरीता खालीलप्रमाणे निधी मंजूर केला असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले आहे.
1) बेलवाडी ते मानेमळा रस्ता - 50 लाख
2) गोरेवस्ती रस्ता - 15 लाख
3) खंडोबा मंदिर सभामंडप - 10 लाख
4) खैरे मळा रस्ता करणे - 10 लाख
5) जि प. शाळा दुरुस्ती -10 लाख रुपये
6) मारुती मंदिर सुशोभीकरण - 5 लाख
7) कुंभारफाटा ते थोरातवस्ती -20 लाख असे एकूण
यासोबत गावचे सुपुत्र नेचर डेअरीचे चेअरमन अर्जुन देसाई यांनी खंडोबा मंदिरासाठी 2 गुंठे जागा मोफत उपलब्ध करून दिल्याचही अॅड.शुभम निंबाळकर यांनी सांगितले आहे.
निंबाळकर म्हणाले की,आमदार भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलाला असून त्यांनी नेहमीच बेलवाडीस निधीच्या बाबतीत झुकते मापं देऊन बेलवाडीचा सर्वांगीण विकासाठी सहकार्य केले आहे. बेलवाडीकर आमदार दत्तात्रय भरणे यांचेसोबत ठामपणे उभे आहेत.
यावेळी बेलवाडीचे उपसरपंच नामदेव इथापे, माजी सरपंच माणिक जामदार,मा उपसरपंच नानासो पवार, ग्रामपंचायत सदस्य, पंकज जामदार,राजेंद्र जामदार, कीर्तिकुमार जामदार,दत्तात्रय जामदार, तुकाराम गोरे, संपत गोरे, पांडुरंग राऊत,भीमराव देसाई,अमोल शिर्के,संतोष जाधव,विठ्ठल खैरे,संजय पवार,सौरभ कदम,गौरव राऊत,दादा यादव माऊली राऊत, शैलेश चव्हाण यांचेसह ग्रामस्थ तरुण उपस्थित होते.
What's Your Reaction?