इंदापुरातील कडबनवाडीत 1400 किलो गोमांस जप्त,55 वासरांची सुटका ! सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल

Apr 3, 2025 - 18:16
 0  764
इंदापुरातील कडबनवाडीत 1400 किलो गोमांस जप्त,55 वासरांची सुटका ! सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल

आय मिरर 

वालचंदनगर पोलिसांनी 1400 किलो गोमांस जप्त करत 55 वासरांना कत्तली पासून वाचवलं आहे. कडबनवाडी नजिकच्या पठाणवस्ती येथील शेतात अवैध कत्तलीची माहिती मिळताच, वालचंदनगर पोलिसांनी मध्यरात्री छापा घालत ही कारवाई केली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दादा पठाण सह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून पोलिसांनी दोन चारचाकी वाहने, इलेक्ट्रिक वजन काटा आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी नजीकच्या पठाणवस्ती येथील दादा पठाण यांच्या शेतात ही कारवाई करण्यात या ठिकाणी अवैधरित्या वासरांची कत्तल केलेले चौदाशे किलो गोमांस वालचंदनगर पोलिसांनी जप्त केले असून 55 वासरे देखील कत्तल होण्यापासून वाचवली आहेत. त्यांना माळशिरस तालुक्यातील मेडद येथील श्रीनाथ गोशाळेत निगा राखण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. 

गुरुवार दिनांक 3 रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस हवालदार गणेश काटकर,वाहन चालक पोलीस हवालदार किसन बेलदार,पोलीस कॉन्स्टेबल विक्रम मोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर हे रात्रीचं अगस्त घालत असताना चालक पोलीस हवालदार किसन बेलदार यांना पोलीस हवालदार गुलाब पाटील यांच्याकडून मौजे कडबनवाडी गावाच्या हद्दीत पठाणवस्ती येथे दादा पठाण यांच्या शेतात वासरांची कत्तल करत आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार गणेश काटकर, वाहन चालक पोलीस हवालदार किसन बेलदार,पोलीस कॉन्स्टेबल विक्रम मोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहनी केली असता त्या ठिकाणी पोलिसांना महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी MH 42 बी एफ 7478 व दुसरी महिंद्रा कंपनीची नंबर प्लेट नसल्याने चारचाकी पिकअप आढळून आली तसेच चौदाशे किलो कापलेले तसेच तुकडे केलेले गोमांस,इलेक्ट्रिक वजन काटा,प्लास्टिकचे बॅनर, प्लास्टिकचा टफ,स्टीलच्या बादल्या,दोन लोखंडे धारदार चाकू असे मिळून 9 लाख 16 हजार किमतीचे मुद्देमाल त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला.शिवाय घटनास्थळी एका सिमेंटच्या हौदा मध्ये वासरांची हाडे शिंगे व बाजूला रक्तात पडलेले मांस आढळून आले.

दरम्यान पोलीस आल्याची चाहूल आत्ताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर घटनास्थळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रमेश पाटील व डॉक्टर अरुण ननवरे व डॉक्टर संतोष भारती यांनी गोमांस चे नमुने पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्या ठिकाणी कापलेले गोमांस दोन पंचासह जेसीबीच्या साह्याने सुमारे मातीत बुजवून नष्ट केले आहे. 

याचवेळी पोलिसांना त्या ठिकाणच्या हौदाच्या बाजूला 55 वासरे तोंडाला व पायाला बांधलेल्या अवस्थेत मिळून आली. त्या 55 वासरे टेम्पो मध्ये भरून माळशिरस तालुक्यातील मेडद येथील श्रीनाथ गोशाळा या ठिकाणी निगा राखण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाठवण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow