आमदार भरणेंकडून इंदापूरकांना मोठे गिफ्ट ; जलसंधारण विभागामार्फत १५ कोटींचा निधी मंजूर 

Jan 17, 2024 - 15:13
 0  1109
आमदार भरणेंकडून इंदापूरकांना मोठे गिफ्ट ; जलसंधारण विभागामार्फत १५ कोटींचा निधी मंजूर 

आय मिरर

नववर्षाच्या सुरवातीलाच आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुकावासियांना मोठे गिफ्ट दिले असून आ.भरणेंनी केलेल्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये साठवण तलाव तसेच साठवण बंधारे बांधण्याच्याकरिता सुमारे १५ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विकासाभिमुख राजकारणामुळे त्यांनी गेल्या आठ-दहा वर्षाच्या कालखंडामध्ये इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास घडवून आणल्याने अल्पावधीतच तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला असुन विकासाच्या बाबतीत इंदापूरची वेगळी ओळख राज्यामध्ये निर्माण झाली आहे.

आ.भरणे हे २०१४ साली आमदार झाल्यापासून ते आजतागायत सातत्याने इंदापूर तालुक्याच्या विकासात भर घालण्यासाठी दर आठ-पंधरा दिवसाला काहीना काही निधी मंजूर करून आणत असून निधीचा हाच वेग कायम ठेवण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी चांगल्याप्रकारे यश मिळवले आहे.यंदा नववर्षाच्या सुरवातीलाच त्यांनी जलसंधारण विभागाचा तब्बल १५ कोटी रूपये निधी मिळवून विकासकामांचाओघ चालू ठेवला आहे.

याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की,विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असून यासाठी आपला शेवटपर्यंत यशस्वीपणे पाठपुरावा होत असल्याने निधी मंजूर करण्यामध्ये अडचण निर्माण होत नाही.त्यामूळे येत्या काही दिवसात इंदापुरकरांना अनेक मोठ-मोठी गिफ्ट मिळणार आहेत.तसेच आजची पंधरा कोटीच्या कामांची मंजुरी ही फक्त सुरवात असून लवकरच आपल्याला यापेक्षाही जास्त निधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

तसेच हा निधी मिळण्याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे श्री.भरणे यांनी शेवटी सांगितले.

मंजूर कामे खालीलप्रमाणे 

गेटेड साठवण बंधारे…

१.भादलवाडी (बाळासो कन्हेरकर वस्ती) - ५०.३३ लक्ष

२.बिजवडी (महादेव नरळे वस्ती) - ४९.८८ लक्ष

३.गोखळी(मंजुळकर शेत)-४८.५३लक्ष

४.कळस (कांबळे शेत,गट नं.७७०)-५८.५६ लक्ष

५.कळस(सांगळे शेत,बागवाडी)-३७.६३लक्ष

६.खोरोची (सुर्यकांत साखरे शेत)-३९.४५ लक्ष

७.निरगुडे (मासाळ शेत,गट नं.८८)-५७.१९ लक्ष

८.पोंदकुलवाडी(मारूती कोकणे शेत गट नं.१४५) - ३६.६१लक्ष

९.रेडणी(आप्पासो मारकड,दिलीप मारकड शेत)-३३.३२लक्ष

१०.रेडणी (बी.के.बी.एन.ब्रीज)-३५.७८ लक्ष

११.शेळगाव(तुपे विहीर)-३४.४७ लक्ष

१२.शेळगाव (ननवरे विहीर गट नं.१६५) - ४०.१२ लक्ष

१३.शेटफळ गढे (शिंदे-फडतरे शेत)-३५.३८ लक्ष

१४.कळस (खारतोडे -शेख शेत)-४७.९३लक्ष

१५.कळस (फरकट-गावडे शेत)-४५.९४ लक्ष

१६.पोंधवडी (गायकवाड-गुरव फार्म)-४७.६७लक्ष

१७.व्याहळी (पवार गुरजी-गथाटे फार्म )-३९.३५ लक्ष

१८.कळस(नाळे-भांडवलकर फार्म )-५२.४६ लक्ष

१९.पिंपळे (लकडे फार्म)-४८.३६ लक्ष

२०.पोंधवडी (पिंपळे ब्रीजजवळ)-४७.९९ लक्ष

२१.बिजवडी(नरळे-काळेल शेत)-३९.७२ लक्ष

२२.बोरी (सुभाष पाठक-इंगळे शेत) - ४८.४९लक्ष

२३.गागरगाव (आप्पासाहेब पोंदकुले शेत)-३९.४७लक्ष

२४.गोखळी(सोपान बारवकर शेत)-‌३१.३८ लक्ष

२५.निरगुडे देवस्थान (मचाले शेत)-३८.७५ लक्ष

२६.सरडेवाडी (गट नं ६५/२)-३६.२८ लक्ष

२७.सरडेवाडी (खटकाळे शेत)-३४.३१लक्ष

२८.वडापुरी (काटकरवस्ती)-४७.४४लक्ष

२९.रूई(लावंड-कांबळे शेत)- ४३.६३लक्ष

३०.अंथुर्णे (वाघवस्ती)-४९.४६लक्ष

३१.अंथुर्णे (घोलपवस्ती)-४८.३६ लक्ष

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow