इंदापूरच्या कांदलगावात संत एकनाथांचा 426 वा षष्ठी सोहळा साजरा

Mar 22, 2025 - 10:03
Mar 22, 2025 - 10:06
 0  162
इंदापूरच्या कांदलगावात संत एकनाथांचा 426 वा षष्ठी सोहळा साजरा

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा 426 वा षष्ठी सोहळा गुरुवारी दि.20 मार्च 2025 रोजी साजरा करण्यात आला. कांदलगाव मधील राखुंडे परिवाराकडून गेल्या साठ वर्षाहून अधिक काळापासून हा सोहळा साजरा केला जातो. यावर्षी देखील मोठ्या भक्ती भावाने हा सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने हरिभक्त परायण विशाल महाराज वाघमारे यांच फुलांचं कीर्तन पार पडले, दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्री एकनाथांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी "एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास" हा एकच जयघोष करण्यात आला.

फाल्गुन वद्य षष्ठी दिवशी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी गोदातीरी जलसमाधी घेतली होती. याला आज तब्बल 426 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने हा षष्ठी सोहळा साजरा करण्यात आला.संत तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला आज 375 वर्षे पूर्ण झाली झाली. ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यात आला, अगदी त्याच पद्धतीने प्रमुख संतांपैकी एक असणाऱ्या श्री संत एकनाथांचा षष्ठी सोहळा देखील साजरा झाला. 

स्वर्गीय गेना दशरथ राखुंडे यांच्या पासून या सोहळ्याला परंपरा आहे. त्यांच्या पाश्चात्य जोगु गेना राखुंडे यांनी या सोहळ्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. आता राखुंडे परिवारातील तिसरी पिढी ही गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा जबाबदारीने पार पाडते आहे.

यानिमित्त पंचक्रोशीतील हा एकमेव सोहळा कांदलगाव मध्ये साजरा होत असल्याने अनेक वैष्णव भक्त या सोहळ्याला उपस्थित असतात. तर कांदलगाव आणि महादेव नगर परिसरातील भजनी मंडळांची देखील या सोहळ्याला मोठी साथ असते. विशेष करून किर्तन केसरी हरिभक्त परायण लालचंद महाराज चोपडे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली हा षष्ठी सोहळा अखंडपणे सुरू आहे तर त्यास मृदंग सेवक हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज सरडे यांची विशेष साथ लाभते आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow