बोरी येथे प्रवीण मानेंच्या माध्यमातून 530 नागरिकांची नेत्र तपासणी
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील बोरी येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास बोरी व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. बोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत ५३० नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ४७७ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १० नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्रविण माने यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून प्रत्येक गावात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
बोरी येथे पार पडलेल्या या शिबिराचे दीपक ठोंबरे, आनंद बापू चव्हाण, आझाद मुलाणी, योगेश कुचेकर, दयानंद चव्हाण, निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, शंकर मारकड, डॉ. शरद शिर्के, डॉ. तमन्ना शेख, डॉ. संतोष रणवरे, डॉ शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या शिबिराच्या निमित्ताने दत्तात्रय गायकवाड, हनुमंत देवडे, भगवान शिंदे, बाळासाहेब जोरी, विष्णू जोरी, अवघडे सर, ज्ञानदेव शिंदे, अशोक गवळी, कैलास जाधव, रेश्माताई कुचेकर, राऊत मॅडम, लोचनाताई भालके, हरीभाऊ धोत्रे, सुनील पवार, पोपट पवार हे मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?