काकांचा आदर्श अन् कष्टाची सांगड घालत कांदलगावची श्रद्धा पाटील सीए झाली
आय मिरर
लहानपणीच वडील वारले दोन्ही चुलत्यांनी सांभाळ केला, जिद्द आणि चिकाटीने शिक्षण पूर्ण केलं अन् आज अखेर ती सी.ए. म्हणजे सनदी लेखापाल झाली.वडिलांचे छत्र हरपलेलं असताना थोरल्या चुलत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्याला कष्टाची सांगड घालत इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मधील श्रद्धा अण्णासाहेब पाटील हिने हे यश संपादन केलं आहे ज्यामुळे तिचं गावभर कौतुक होतंय.
श्रद्धा अण्णासाहेब पाटील ही कांदलगाव मधील स्वर्गीय दादासाहेब दाजीबा पाटील यांची नात तर स्वर्गीय सरपंच मालोजी आप्पा उर्फ रवींद्र दादासाहेब पाटील यांची पुतणी. स्वर्गीय अण्णासाहेब दादासाहेब पाटील यांचं दुःखद निधन झालं.
श्रद्धा तीन वर्षाची असतानाच तिचं वडिलांच छत्र हरपल, त्यानंतर आई शैलजा पाटील थोरले चुलते माजी विभागीय कृषी अधिकारी प्रतापराव दादासाहेब पाटील आणि मधवे चुलते स्वर्गीय मालोजी उर्फ रवींद्र दादासाहेब पाटील या दोघांनीच तिला वडिलांची माया दिली.तिला घडवलं,शिक्षण दिलं.
कांदलगाव मधील पाटील घराणं हे इंदापूर तालुक्यात सर्व दूर परिचित आहे.पाटील घराण्याला राजकारणाचा वारसा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक वर्ष स्वर्गीय दादासाहेब दाजीबा पाटील यांनी गावचं नेतृत्व केलं,त्यानंतर मालोजी आप्पा उर्फ रवींद्र दादासाहेब पाटील यांनी अनेक वर्ष गावची सरपंच पदाची धुरा सांभाळली मात्र मागील काही महिन्यांपूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं.
स्वर्गीय रवींद्र पाटील यांच्या पत्नी ऋतुजा पाटील या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. याशिवाय त्या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. तर प्रतापराव पाटील यांच्या पत्नी पद्मजा पाटील या देखील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. श्रद्धा पाटील च्या आई शैलजा पाटील या गावच्या पोलीस पाटील आहेत. एकूणच पाटील घराणं हे सुशिक्षित आणि शिक्षित आहे. हाच विचारांचा वारसा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून सनदी लेखापाल पदवी प्राप्त करीत श्रद्धा पाटील ने गावची मान अभिमानानं उंचावली आहे.
मात्र आज श्रद्धाच आहे यश पाहण्यासाठी तिचे वडील अण्णासाहेब पाटील आणि चुलते मालोजी आप्पा उर्फ रवींद्र दादासाहेब पाटील हे असायला हवे होते हीच भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते.श्रद्धा पाटील ने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच कौतुक होत असून गावकऱ्यांकडून देखील तिचा सत्कार करण्यात आला.
What's Your Reaction?