फिनोलेक्स् मुळे त्यांना मिळाला आधार ! कडाक्याच्या थंडीपासून होणार संरक्षण

Dec 2, 2023 - 15:13
 0  113
फिनोलेक्स् मुळे त्यांना मिळाला आधार ! कडाक्याच्या थंडीपासून होणार संरक्षण

आय मिरर

मुकुल माधव फाउंडेशन पुणे व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सौजन्याने शनिवारी दि.०२ डिसेंबर रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी येथील ऊसतोड 50 कामगारांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.यामुळे या हिवाळ्या जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून या ऊसतोड मजुरांचे संरक्षण होणार आहे.

समाजामध्ये काम करत असताना गरजू लोकांना काही आवश्यक साहित्य वाटप करणे याचे आपणास समाधान वाटते असे मत वितरक महाराष्ट्र एजन्सी यांचेमार्फत नंदकुमार गुजर यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमासाठी फिनोलेक्स कंपनीचे सेल्स ऑफिसर निलेश घुले,कारखान्याचे मा.संचालक वामनराव सरडे,तुषार गुजर, प्रमोद भंडारी, लक्ष्मण भगत, प्रवीण सरडे,टोळीचे मुकदम व सर्व ऊसतोड कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow