सुनेत्रा पवारांसाठी भरणे पिता पुत्र मैदानात ; श्रीराज भरणेंकडून घर टु घर मोहीम 

Apr 27, 2024 - 15:12
 0  1552
सुनेत्रा पवारांसाठी भरणे पिता पुत्र मैदानात ; श्रीराज भरणेंकडून घर टु घर मोहीम 

आय मिरर(देवा राखुंडे)

बारामती लोकसभा मतदार संघात विजयाचा गुलाल कोण उधळवणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात ही अटीतटीची लढत होत असून इंदापूर तालुक्यात दोन्ही गटाकडून प्रचार शिगेला पोहचला आहे. अशात सुनेत्रा पवारांसाठी आमदार दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे देखील मैदानात उतरले असून श्रीराज भरणेंकडून घर टु घर गाठीभेटी घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचार धेय्य धोरणे आणि मोदींना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या घड्याळाच्या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन केलं जातयं.

आमदार दत्तात्रय भरणे हे अगोदर पासून तालुक्यातील विविध भागात जाहिर सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा घेत असून मतदारांशी ते संवाद साधत आहेत.तर भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी युतीचा धर्म पाळत गेल्या आठवडाभरापासून इंदापूर तालुका पिंजून काढला आहे. तर मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी देखील इंदापूर तालुक्यातील अनेक गावात संपर्क साधला असून गावागावत प्रचार सभा घेत सुनेत्रा पवारांचं घड्याळ हे चिन्ह घराघरात पोहचवण्याचं काम केले आहे.

तर आता भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे युवा सहका-यांना सोबत घेऊन तालुक्यातील विविध भाग पिंजून काढत असून युवकांच्या मतदीने मोहीम फत्ते करीत आहेत. इंदापूर शहरासह तालुक्यात श्रीराज भरणे यांचा दांडगा संपर्क असून युवकांचे मोठे संघटन त्यांनी निर्माण केले आहे. या युवकांच्या संघटनाच्या जोरावर ते प्रचारात सहभागी झाले असून निश्चित यातून सुनेत्रा पवारांना फायदा होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow