सासवडमध्ये काँग्रेस कमिटीचं निषेध आंदोलन ! आ.संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंचा नोंदवला निषेध

Sep 19, 2024 - 16:45
Sep 19, 2024 - 16:46
 0  159
सासवडमध्ये काँग्रेस कमिटीचं निषेध आंदोलन ! आ.संजय गायकवाड  आणि अनिल बोंडेंचा नोंदवला निषेध

आय मिरर

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्या आमदार संजय गायकवाड आणि आमदार अनिल बोंडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सासवड मध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.

आज सासवड येथील शिवतीर्थावर एकत्रित येत काँग्रेस कमिटीने आ.संजय गायकवाड व अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. 

सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते. केंद्र सरकार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका टिपण्णी केली तरी त्याला लगेच अटक केली जाते मात्र शिवसेनेचे आमदार खुनाच्या धमक्या देतात,विरोधी पक्षाच्या नेत्यांची जीभ छाटण्यासाठी आवाहन करता आणि त्यासाठी बक्षीसही जाहीर करतात हे लोकशाहीला घातक असल्याचं म्हणत या दोन्ही नेत्यांचा निषेध करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow