मोठी बातमी | गणित कुठं बिघडलं ? प्रशांत गलांडे पाटलांचा तीनचं महिन्यात पदाचा राजीनामा 

Apr 25, 2024 - 17:10
Apr 25, 2024 - 17:33
 0  3101
मोठी बातमी | गणित कुठं बिघडलं ? प्रशांत गलांडे पाटलांचा तीनचं महिन्यात पदाचा राजीनामा 

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर तालुक्यातील गंगावळण गावचे युवा नेते प्रशांत गलांडे पाटील यांनी आपल्या बारामती लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाचा ऐन लोकसभा निवडणूकीत राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.गलांडे पाटील यांनी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे.

18 जानेवारी 2024 रोजी गलांडे पाटील यांनी भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत गंगावळण ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच निकिता प्रशांत गलांडे पाटील यांसह उपसरपंच अभिजित नलवडे आणि इतर काही सदस्य व सोसायटीचे विद्यमान चेअरमन यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी या पक्ष प्रवेशाची मोठी चर्चा झाली होती.मात्र तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत जुळलेलं सूत अचानक विस्कटल्याने गलांडे पाटलांच्या इनकमिंग नंतर ज्यांनी राष्ट्रवादीचं घढ्याळ हाती बांधलं त्यांच्या मनात काय ? प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान आपण आ.भरणेंसोबत आहोत. आपण केवळ पदाचा राजीनामा दिला आहे.नेतृत्व सोडलेलं नाही अशी प्रतिक्रिया प्रशांत गलांडे पाटील यांनी "आय मिरर" शी बोलताना दिलीय.

गलांडे पाटील बोलताना असे ही म्हणाले आपण भरणे यांच्या कामास प्रेरीत होऊन राष्ट्रवादीत गेलो. आता तीन महिण्यांचा अनुभव ही आला. भरणे यांची काम करण्याची पध्दत वेगळी आहे. मात्र त्यांच्या नंतर काम करणारे यांच्या पध्दती खुपचं वेगळ्या आहेत.त्यामुळे आपण थांबणे हेच योग्य म्हणून हा निर्णय घेतला. माझ्याकडे बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस युवक ची जबाबदारी असताना तिथेही कुरघोड्या केल्या गेल्या.आपण कार्यरत असताना आणखी एकाला याच पदाची धूरा दिली. याचा अर्थ काम करण्यास वाव नाही. त्यामुळे आजपासून पक्षाचं कोणतही काम मी करणार नाही तर आमदार भरणे यांसाठी मी कार्यरत असेल. इतर कुठे जाण्याचा अथवा घरवापसीचा विचार नाही.

गलांडेंच्या पक्ष प्रवेशानंतर भरणेंच्या गोटात मोठी भर्ती…

प्रशांत गलांडे यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून जानेवारी 2024 मध्ये माजी मंत्री आ.दत्तात्रय भरणे यांची सोबत धरली. गावच्या सरपंचासह सदस्य आणि सोसायटीचे चेअरमन यांना घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.यानंतर भावडीचे संग्राम देशमुख यांनीही हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली. तर कळाशीचे माजी सरपंच नामदेव करे ही भरणेंच्या ताफ्यात दाखल झाले. मात्र जाणारे का गेले ते सांगताना जाहिर सभांमधून हर्षवर्धन पाटील यांनी आ.भरणेंवर अनेक आरोप केले. जे गेले ते कमिशनसाठी गेले असा ही आरोप पाटलांनी केला.आता गलांडे पाटलांच्या राजीनाम्यानं भाजपाला आरोपांचं मैदान उठवायला चांगलचं रान मोकळं झालयं. 

कोण आहेत प्रशांत गलांडे पाटील?  

प्रशांत गलांडे पाटील यांवर भाजपा युवा मोर्चाच्या राज्याच्या सहसंयोजकाची जबाबदारी होती.यासोबतचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह पदाची जबाबदारी ही त्यांकडे होती.शिवाय हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख असल्याने त्यांच्या प्रवेशाने पाटील यांसाठी मोठा धक्का मानला गेला होता. त्यांच्या पत्नी निकिता प्रशांत गलांडे पाटील या गंगावळण गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. युवा नेतृत्व म्हणून ही गलांडे पाटील यांची ओळख आहे.

गलांडे पाटलांपुढे मार्ग कोणते?

ज्या उमेदीने प्रशांत गलांडे पाटील आ.भरणेंच्या ताफ्यात दाखल झाले आणि जाहीर सभांच्या मंचावरुन विरोधी गटावर आरोपांच्या फैरी झाडू लागले हे पाहता पाटलांचा काळ चांगला गाजेल असं चित्र होतं.मात्र हे सर्व थोडक्यातचं गुंडळावं लागलं. याचा अर्थ आ.भरणेंकडून पाटलांची खातीरदारी होण्यात कमतरता राहिली असा होतो.आता राजीनाम्या नंतर प्रशांत गलांडे पाटील घरवापसी करुन पुन्हा हर्षवर्धन पाटलांसोबत सक्रीय होऊ शकतात. याचा 2024 विधानसभेला पाटलांना फायदा ही होईल आणि तशा प्रध्दतीचा प्रयत्न हर्षवर्धन पाटील करु शकतात.

यासोबत गलांडे पाटलांपुढे शरद पवार गटात दाखल होण्याचा मार्ग ही आहे.सध्या इंदापूरात आ.भरणेंसह बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानं अगदी छोट्यातील छोटा कार्यकर्ताही सुळेसाठी अत्यंत महत्वाचा आहे.आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं युवकांमध्ये ही नवचैतन्य आलयं.शिवाय शरद पवार गटाचे कार्यध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या नेतृत्वातचं गलांडे पाटलांनी ग्रामपंचायतीचा गड जिंकला होता. त्यामुळे अल्पकालावधी झालेला दूरावा केव्हाही संपुष्टात येऊन दिलजमाई होऊ शकते.याचाच फायदा घेत गलांडे पाटील तुतारी ही फुंकू शकतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow