आज चाकणकर इंदापूरात ! आ.भरणेंच्या गळाला आणखी एक मोहरा

Nov 9, 2024 - 22:00
Nov 10, 2024 - 07:39
 0  866
आज चाकणकर इंदापूरात ! आ.भरणेंच्या गळाला आणखी एक मोहरा

आय मिरर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असून रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर शहरात श्री संत सावता माळी मंदिरामध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अतुल व्यवहारे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून अतुल व्यवहारे यांची ओळख होती.गेल्या दोन दिवसापूर्वी इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन देवराज जाधव यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडल्यानंतर आता अतुल व्यवहारे यांनी देखील मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.

माळी समाजाचे नेते म्हणून अतुल व्यवहारे यांची ओळख असून स्वराज विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून अतुल अतुल व्यवहारे समाजकारण आणि राजकारणात सक्रीय आहेत.त्यांचे वडील स्वर्गीय नानासाहेब केरबा व्यवहारे हे कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सोबत तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होते.कर्मयोगींनी कारखान्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवली होती.

गेल्या अनेक वर्षाचे पाटील आणि व्यवहारे परिवाराचे कौटुंबिक संबंध होते.हर्षवर्धन पाटील यांनी देखील व्यवहारे यांना कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याची संचालक पदाची जबाबदारी सोपवली होती.दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अतुल व्यवहारे हे राजकारापासून अलिप्त राहिल्याचे पहायला मिळाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow