पडळकर घटनेच्या निषेधार्थ ओबीसी संघटनांनी पुकारलेल्या इंदापूर बंद ला विरोध करु नका तर त्यात सहभागी व्हा - अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचे आवाहन
आय मिरर
दोन दिवसापूर्वी इंदापूर तहसील कचेरी समोर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने इंदापूर तालुका बंदची हाक दिलेली आहे सदरची गोष्ट भावनिक असल्यामुळे समाज बांधवांनी सदर बंद मध्ये सहभागी व्हावे अथवा बंदला कोठेही विरोध करु नये.
बंदच्या काळामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांनी केले आहे.
जगताप म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही राज्य शासनाकडे आहे. मराठा आरक्षण कोणत्याही जाती धर्माच्या विरोधी नाही ती कायदेशीर मागणी आहे.विशेषता तरुणांनी दक्षता घेऊन बंद काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व त्यामुळेही मराठा आरक्षण प्रक्रिया लांबणीवर जाणार नाही याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी.
What's Your Reaction?