पाणी आणण्यासाठी सक्षम -आ. भरणे, इंदापूर तालुक्यातील विरोधकांनी विनाकारण श्रेय घेऊ नये

Oct 23, 2023 - 07:40
 0  218
पाणी आणण्यासाठी सक्षम -आ. भरणे, इंदापूर तालुक्यातील विरोधकांनी विनाकारण श्रेय घेऊ नये

आय मिरर

खडकवासला व नीरा डाव्या कालव्याचे पाणी शेती सिंचनासाठी आणण्याकरीता पालकमंत्री अजित पवार यांच्यामाध्यमातून आमदार या नात्याने आपण सक्षम आहोत, असे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे येथे कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत खडकवासला व नीरा डावा कालव्याला सोडण्यासंदर्भात इंदापूर तालुक्याचा आमदार या नात्याने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी केली. मी केलेल्या आग्रही मागणी पालकमंत्री अजित पवार यांनी मान्य करत जलसंपदा विभागाला इंदापूरच्या शेती सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शेटफळ तलाव १०० टक्के भरण्याची मागणी पालकमंत्री पवार यांना करण्यात आली आहे. त्यानुसार इंदापूर करिता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाणी आणण्यासाठी आणण्यासाठी आपण सक्षम आहोत. विरोधकांनी विनाकारण यात श्रेय घेण्याचे काम करू नये.

मी २२ गावातील एक शेतकरी असून पाण्याबाबत काय समस्या असतात ते मला माहित आहे. याशिवाय लाकडी निंबोडी योजनेचेही प्रयत्न पालकमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी लाकडी निबोडी योजना मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्याची निविदाही निघाली आहे. त्यामुळे विनाकारण विरोधकांनी याचे श्रेय घेऊ नये. कारण जनतेला खरे काय आणि खोटे काय हे समजते. उसने अवसान घेऊन कधीच श्रेय मिळू शकत नाही. तालुक्यातील जनता ही खूप हुशार आहे त्यांना कामाचे कोण आणि बिनकामाचे कोण हे चांगले माहित आहे असे यावेळी आमदार भरणे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow