आ.भरणेंचा तो व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट अन् एकचं खळबळ माजली

May 7, 2024 - 11:44
May 7, 2024 - 12:04
 0  1462
आ.भरणेंचा तो व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट अन् एकचं खळबळ माजली

आय मिरर

इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अर्वाच्च भाषेत शिविगाळ करणारा आणि धमकी देणारा एक व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला असून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँन्डल वर पोस्ट केला आहे.

इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील ग्रामपंचायत इमारतीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे.ज्यात भरणे यांनी समोरच्या एका व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत माझ्याशी गाठ करण गावात कोणाला सोपं नाही,एखाद्याची वाटचं लावेन.निवडणूका होतील जातील सहा नंतर तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे आई बाप असंही ते म्हणत आहेत.दातात गुंतल्यानंतर माझीच मदत लागते पण मस्ती केली तर मस्ती उतरवेन असं ही भरणे म्हणत आहेत.

अर्थात आमदार दत्तात्रय भरणे एवढे का संतापले होते नेमकं काय झालं होतं याचं कारण मात्र समोर आलेलं नाही.

रोहित पवार पोस्ट मध्ये काय म्हणतात……

हा दडपशाही पुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… 

विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते.पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही !

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow