आत्ताची सर्वात मोठी बातमी | हर्षवर्धन पाटलांचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र - केली कारवाईची मागणी ; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ते वक्तव्य भोवणार ?
आय मिरर(देवा राखुंडे)
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी राज्यात सत्तेमध्ये सहभागी असले तरी स्थानिक पातळीवर मात्र या दोन्ही पक्षांमध्ये मोठा विरोधाभास पाहायला मिळतोय.पुण्याच्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार जुंपली असून गंगावळण या ठिकाणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यात फिरून देणार नसल्याचा गर्भित इशारा दिला होता. यानंतर हे प्रकरण आता चांगलंच पेटल्याचा पाहायला मिळत असून हर्षवर्धन पाटील यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी एक पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहले असून ते पत्र त्यांनी आपल्या ट्विटर हँन्डलवर पोस्ट केल आहे.
काय आहे पत्रात……
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.
सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती.
अशा पद्धतीचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं असल्याने देवेंद्र फडणवीस या बाबीकडे आता किती गंभीरतेने पाहणार याकडे तालुक्याची नजर लागली आहे.
What's Your Reaction?