BREAKING NEWS | वडापुरी येथे गर्भवती महिलेचा मृत्यू,घरीच गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप ! तिघांवर गुन्हा दाखल

Sep 24, 2024 - 07:08
Sep 24, 2024 - 22:02
 0  2490
BREAKING NEWS | वडापुरी येथे गर्भवती महिलेचा मृत्यू,घरीच गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप ! तिघांवर गुन्हा दाखल

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील वडापुरीत एका 23 वर्षीय गर्भवती महिलेचा घरीच गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी इंदापूर पोलिसात मयत महिलेचा पति,सासु सासरे अशा तिघांवर भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 90,91,85,3(5) नुसार मयत महिलेचा भाऊ विशाल शंकर पवार याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

ऋतुजा राहुल धोत्रे वय 23 वर्षे असं मृत्यू झालेल्या महिलेचे नांव असून राहुल भिमराव धोत्रे, लक्ष्मी भिमराव धोत्रे आणि भिमराव उत्तम धोत्रे सर्व रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे अशी आरोपींची नांवे आहेत.

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात असून ही असं कृत्य केल्यानं या घटनेबाबात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.  

ऋतुजाचा वडापूरी येथील राहुल धोत्रे याच्याशी सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला एक मुलगा एक मुलगी अशी अपत्य आहेत. ती चार महीण्याची गर्भवती असताना कुटुंबियांनी तिची गर्भ तपासणी केली. तिच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आहे हे माहीती झालेनंतर पती,सासु व सासरे या सर्वांनी मिळून खाजगी डॉक्टर घरी बोलावुन ऋतुजाला गर्भपात होण्याच्या गोळया औषधे देवुन तिचा रविवारी गर्भपात केला. चार महीण्याचे स्त्री जातीचे अर्भक जमीनीमध्ये पुरून टाकले. यामध्ये ऋतुजाचा अति रक्तस्त्राव झाल्याने सोमवारी दि.23 रोजी मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.अधिकचा तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक गटकुळ करीत आहेत.

याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड म्हणाले, नातेवाईकांनी केलेल्या आरोपा नुरूप संबंधित महिलेचा घरगुती गर्भपात केल्याने मृत्यू झाला असल्याचे म्हणणे आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील ठोस कार्यवाही करण्यात येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow