मी चार वेळा ईव्हीएमवर बारामती जिंकली ! मी कसं म्हणणार ?
आय मिरर
बारामतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतपडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता.मात्र हा अर्ज माघारी घेण्यात आला आहे.मी चार वेळा ईव्हीएम बारामती लोकसभा निवडणूक आली त्याच्यामुळे मी कसं म्हणणार ? असं म्हणत सुळे यांनी एकप्रकारे ईव्हीएम ला समर्थन दर्शवले आहे.त्या बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस ईव्हीएम मुद्दा बाजूला केला का असं सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की,मी एका उमेदवाराबद्दल बोलत होते.युगेंद्र पवारांनी रिकाउंटींग करु नये असं माझं वैयक्तीक मत होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की अर्ज मागे घ्यावा.बाकीच्या ठिकाणी लोकांचे म्हणनं आहे की आम्ही मतदान केलयं पण ते निवडणून आले नाहीत.
मी स्वत: चार वेळा ई व्ही एम वर निवडून आलेय त्याच्यामुळे मी कसं म्हणणार अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.मला असं वाटतं की आपण पारदर्शक काम करत असेल तर ईव्हीएम वर काय अन् बॅलेटवर काय हट्ट कशासाठी? लोकांची मागणी असेल बॅलेट पेपर वर तर अडचण काय असं ही सुळे म्हणाल्या
खा.सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौ-यावर आहेत.सुळे म्हणाल्या की ही माझी चौथी टर्म आहे.महिन्यातील ९ दिवस माझे प्रत्येक तालुक्यात जातात,आठवड्यात एकदा मी बारामतीचा दौरा करते.
सध्या दूधाच्या दराचे प्रश्न आहेत.अनुदान वेळेवर येत नाही.अनुदाना ऐवजी दूधाला दर वाढवून द्यावा. ३५-४० रुपये दर द्यावा अशी मागणी लोकांमधून येत आहे.जानाई शिरसाई योजनेबाबत जी अपूर्ण कामे आहेत.त्याबाबत मागणी येत आहे.महागाई बाबत जीएसटी बाबत प्रश्न येत आहेत.
What's Your Reaction?