तलवारीने दहशत निर्माण करणारा गुन्हेगार भिगवण पोलिसांनी केला गजाआड

आय मिरर(निलेश मोरे)
शेतफळगढे येथील बारामती ऍग्रो सह.साखर कारखान्याच्या परिसरातील हमाल चाळी समोर तलवारीने दहशद निर्माण करणे एकाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी भिगवण पोलिसांनी एकाला अटक केली आहे.बंटी उर्फ विकम मधुकर मचाले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.14 मार्च 25 रोजी सायं सव्वा सहा च्या सुमारास शेटफळगळे येथील कारखान्याच्या समोरील हमाल चाळीचे समोर बंटी उर्फ विकम मधुकर मचाले व त्याचे इतर २ ते ३ साथीदार हे स्वतःचे हातात तलवार घेवुन भाऊ वैभव मचाले याचे बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी सुनिल रॉय याला हाताने मारहाण केली.
तसेच हातात तलवार घेवुन मोठमोठयाने आरडा ओरडा करून शिवीगाळ करत आम्ही या ठिकाणचे भाई आहोत आम्हाला कोण आडवितो ते बघु असे म्हणून कामगारांचे दारावर दगड मारत त्या ठिकाणी दहशत माजविली. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याने त्यांचे फोन बंद करून तो पसार झाला होता. पोलिसांनी गोपनिय बातमीदार यांचे मदतीने माहीती काढून त्यास दि.21 मार्च रोजी अटक केली आहे. त्यास इंदापूर न्यायालयाने 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा.महेश उगले हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देखमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस हवालदार महेश उगले, संतोष मखरे, रामदास कर्चे, अनिकेत शेळके यांनी केली आहे.
What's Your Reaction?






