CRIME NEWS शेतातील पाण्याच्या पाळीवरून वाद,एकाचा खून

आय मिरर (राहुल शिंदे)
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील आंबळे गावा जवळील जगताप वस्तीवर शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एका शेतकऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडलीय.. याप्रकरणी जेजुरी पोलिसात ५५ वर्षीय बाळूदास काळुराम जगताप याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...तर यामध्ये ४० वर्षीय अविनाश मल्हारी जगताप यांचा मृत्यू झाला.
पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ जगताप वस्तीवर शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एका शेतकऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडलीय तर या घटनेमध्ये आरोपी सह आणखी दोन जन गंभीर जखमी झालेत.मल्हारी जगताप, गणेश जगताप अस या जखमींचं नाव असून सर्वजण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
What's Your Reaction?






