भीमापात्रात सुरू असलेलं सर्च ऑपरेशन 40 तासानंतर थांबलं ! सहा जणांना मिळाली जलसमाधी

आय मिरर
भीमापात्रात गेल्या 40 तासाहून अधिक सुरू असलेलं सर्च ऑपरेशन अखेर 10 वाजून 25 मिनिटांनी थांबलं गेल.मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाच सुमाराला करमाळ्यातील कुगाव मधून इंदापूरच्या काळाशीत प्रवाशांना घेऊन येणारी बोट वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडली आणि या बोटीलाच जलसमाधी मिळाली. या बोटीत प्रवास करणारे सहा प्रवासी भीमा पात्रात बुडाले अखेर या सहाच्या सहा प्रवाशांना उजनीत जलसमाधी मिळाली आहे.
गेल्या 40 तास होऊन अधिक काळ या बेपत्ता प्रवाशांचा तपास सुरू होता अखेर आज सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हे सर्व सहाच्या सहा मृतदेह हाती लागलेत.
गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) तर कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदी पात्रात मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी होडी (लॉन्च) ही वादळी वाऱ्याचा फटका बसून भीमा नदी पात्रात बुडाली गेली. यात एकूण सात प्रवासी होते त्यापैकी सहा.पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून पाण्यातून बाहेर आला त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून एनडीआरएफ च्या माध्यमातून शोध मोहीम सुरु करण्यात आली. दोन सव्वादोन तासांच्या प्रयत्नानंतर ही यश न आल्याने एनडीआरएफ च्या दोन पाणबुडी उजनी पात्रात सोडण्यात आल्या.पाणबुडी पाण्यात सोडल्यानंतर बुडालेल्या बोटीचा सुगावा लागला.बुडालेली बोट हलवून ही पाहीली मात्र हाती काही लागलं नाही.पाणबुडीच्या मदतीनं केवळं त्या ठिकाणी बोटीतील दुचाकीचा शोध लागला.मात्र बुडालेले ते सहा लोक सापडले नाहीत. त्यानंतर एनडीआरएफ पथकाने शोधमोहिम थांबवली.आज गुरुवारी सकाळपासून शोधकार्यास सुरवात झाली. त्यानंतर पाण्यावर तरंगताना एक एक मृतदेह हाती लागले. आणि अखेर दहा वाजून 25 मिनिटांच्या सुमारास हे सर्च ऑपरेशन थांबलं.
What's Your Reaction?






