इकडे भीमा नदीत सहा जण बुडाले तिकडे एसडीआरएफच्या जवानांची बोट उलटली ; अधिकाऱ्यासह तिघांचा मृत्यू

May 23, 2024 - 17:11
May 23, 2024 - 17:13
 0  2374
इकडे भीमा नदीत सहा जण बुडाले तिकडे एसडीआरएफच्या जवानांची बोट उलटली ; अधिकाऱ्यासह तिघांचा मृत्यू

आय मिरर

उजनी जलाशयात भीमा नदीच्या पात्रात बोट बुडाली.यात सहा जणांना जलसमाधी मिळाली. पण त्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफचं पथक बुधवार पासून या ठिकाणी प्रयत्न करीत होतं.अखेर आज गुरुवारी साडेदहा च्या सुमारास सर्वांचे मृतदेह मिळून आले.

परंतु त्याच वेळी आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे.ती म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफ च्या पथकातील एक बोट बुडाल्याने दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय.  

या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये धुळ्यातील एसडीआरएफ च्या जवानांची एक बोट पलटल्याने यामधील एका अधिकाऱ्याचा व दोन जवानांचा मृत्यू झाला असून दोन जवानांना वाचवण्यात यश आले आहे. 

काल बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील पाच जण आणि स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख असे सहा जण बुडाले.  

धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) आणि अर्जुन रामदास जेडगूले यांचा शोध अद्याप सुरु आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow