इंदापूरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा थरार ! वाचा कुठे कुठे झालं नुकसान
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर शहरासह तालुक्यांमध्ये आज पुन्हा एकदा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडासह पूर्व मौसमी पाऊस झालाय.इंदापूर शहरातील इजगुडे पेट्रोल पंपाच्या समोरील विजेच्या खांबावर वीज कोसळली आहे.तर पडस्थळ येथील पांडुरंग मारकड यांच्या खाजगी गुळ उत्पादन करणाऱ्या कारखान्याचही मोठं नुकसान झालेलं आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे सर्वांचीच दयना उडालीय.गेल्या चार दिवसापासून इंदापूर तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस कोसळतो यामुळे इंदापूर तालुक्यातील केळी भागांचं देखील मोठा नुकसान झालेलं आहे.तर शहा मध्ये प्रकाश निकम यांच्या जनावरांच्या गोठ्या जवळील शेवग्याचे झाड भिंतीवर कोसळल्याने मोठं नुकसान झालेलं आहे.
उजनीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे उत्पादन घेतलं जातं गेल्या चार-पाच दिवसापासून वादळी वारा आणि अवकाळी पाऊस कोसळतोय यामुळे काढणीला आलेल्या केळी बागांच मोठा नुकसान झालेलं आहे. गलांडवाडी नंबर एक येथील जीवन गलांडे यांच्या दीड एकर केळी बागेचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. गलांडे यांची केळीची बाग काढणीस आलेली होती. लाखो रुपये खर्च करून हाता तोंडाशी आलेलं पीक निसर्गाच्या क्रुरतेमुळे उध्वस्त झाले.निसर्गाने आमच्या तोंडचा घास पळवल्याचं जीवन गलांडे यांनी सांगितले.
यासोबत इंदापूर शहराच्या बाह्यवळणार असलेल्या संत निरंकारी मंडळ इंदापूर सत्संग भवनचे शेड वादळाने उध्वस्त झाले असून इंदापूरच्या पळसदेव मध्ये भीमा नदीच्या काठी वादळी वारे आणि पावसामुळे ६ मच्छिमारांच्या होड्यांचं प्रचंड नुकसान झालयं.अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नदीकाठावर बांधलेल्या होड्या उलट्या होऊन काही पाण्यात बुडाल्या तर काही होड्यांचे जागीच तुकडे तुकडे झाले आहेत.
What's Your Reaction?