राहुरीतील वकील दांपत्याच्या हत्या प्रकरणी इंदापूर तालुका बार असोसिएशनचा तहसीलवर निषेध मोर्चा

आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर तालुका बार असोसिएशन कडून राहुरी तालुक्यातील वकील पती-पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी दि.०८ फेब्रुवारी रोजी इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गाने निषेध मोर्चा काढत बार असोसिएशनने इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आपल्या मागण्यांसंदर्भातील निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील अँड. राजाराम जयवंतराव आढाव व त्यांची पत्नी अँड. सौ. मनिषा राजाराम आढाव यांची दि. २५ जाने २०२४ रोजी क्रूरपणे हत्या केलेली आहे. सदर घटनेचा इंदापूर वकील संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करणेत येत आहे.
सदर घटना अत्यंत निर्दनीय असून सदर घटनेमुळे वकील वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण होवून मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे. सदरची घटना शासनाने गंभीरपणे घेवून सदर वकील पती-पत्नी यांचे सर्व मारेकरी व त्यांचे पाठीराखे यांचेवर कडक कायदेशीर कार्यवाही करून त्यांचे विरूध्दचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ चालविणेत येवून सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चात बार असोशिएशनचे अध्यक्ष अँड. माधव शितोळे,उपाध्यक्ष अँड. धैर्यशील नलवडे,अँड.अनिल पारेकर,सचिव अँड. आसिफ बागवान, खजिनदार अँड.संकेत नगरे,ग्रंथपाल अँड. वैजनाथ गायकवाड, अँड. विशाल राऊत,अँड.जयश्री खबाले,अँड.कृष्णाजी यादव, अँड.ए.जी. शहा,अँड.रणजित शितोळे,अँड.रणजित चौधरी,अँड.एल.पी. शिंगाडे,अँड. तेजसिंह पाटील, अँड.आशुतोष भोसले,अँड.संदीप शिंदे,अँड.सचिन राऊत,अँड.प्रतिम सुर्यवंशी,अँड.रविंद्र कोकरे यांसह बार असोशिएशनचे अनेक सदस्य सहभागी झाले होते.
What's Your Reaction?






