इंदापूरातील गंगावळण सराफवाडीत मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च
आय मिरर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केलेय.याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गंगावळण आणि सराफवाडी गावात गुरुवारी दि.26 आँक्टोंबर रोजी रात्री उशिरा कॅन्डल मार्च काढून आरक्षणाची मागणी करण्यात आलीय.
गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने हातात मेणबत्ती डोक्यावर टोपी आणि आकाशात भगवे ध्वज उंचावत गावातील मुख्य चौकातून जय भवानी जय शिवाजी! आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे! मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे! अशा जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलीय .
What's Your Reaction?