सरडेवाडीत महिला बचतगटांना अर्थसाहाय्य वितरण

Sep 15, 2023 - 13:56
 0  183
सरडेवाडीत महिला बचतगटांना अर्थसाहाय्य वितरण

आय मिरर

ग्रामपंचायत सरडेवाडी अंतर्गत राजमाता अहिल्याबाई होळकर ग्रामसंघाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य वितरण करण्यात आले.एकूण सात लक्ष वीस हजार रूपयांचे कर्जवाटप गावातील बचतगटांना मागणीनुसार करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली.

धनलक्ष्मी, शिवकन्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई, जिजाऊ, महालक्ष्मी, सावित्री, राजमाता, जिजामाता, महालक्ष्मी,स्वप्नपूर्ती ह्या महिला स्वयंसहायता समूहांना कर्ज वाटप करण्यात आले.या सर्व महिलांना आवश्यकतेनुसार अर्थसाहाय्य करण्यासाठी गावसमन्वयक वैशाली शिद यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी बोलताना सरपंच जानकर म्हणाले की,महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे,त्यासाठी ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामसंघाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार आहोत,महिलांना विविध प्रशिक्षण येणार्‍या काळात उपलब्ध करून देणार आहोत.

यावेळी ग्रामसंघ अध्यक्षा सोनाली जानकर,सचिव नकुसा जमदाडे, कोषाध्यक्ष सारिका सरडे,सदस्या प्रियंका शिद,वैशाली शिद,सुप्रिया कोळेकर,वैशाली कोळेकर,गयाबाई तोबरे,अलका कडाळे,उमेद अभियान व्यवस्थापक सचिन बाबर,अमर कदम तसेच विविध बचतगटाच्या अध्यक्षा व सचिव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आभार ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow