खाजगी बस ला भीषण अपघात ; सहलीसाठी निघाले होते विद्यार्थी - क्लिनरचा जागीच मृत्यू

Mar 20, 2024 - 14:47
 0  1009
खाजगी बस ला भीषण अपघात ; सहलीसाठी निघाले होते विद्यार्थी - क्लिनरचा जागीच मृत्यू

आय मिरर

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका खासगी बसला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.या घटनेत बसमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात ४९ विद्यार्थी आणि शिक्षक बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.या बस मधील विद्यार्थी हे सहलीसाठी निघाले होते अशी माहिती प्राप्त होत आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली परिसरात बुधवारी (ता. २०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातील जखमींना गगनगिरी महाराज आश्रमात दाखल करण्यात आलं आहे.

काही क्षणातच बस अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात बसमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने ४९ विद्यार्थ्यांसह शिक्षक अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी गगनगिरी महाराज आश्रमात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow