मुंबईत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची सुरुवात
आय मिरर
टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा स्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण उपस्थित होते. सामाजिक सलोखा वाढविणारी, बंधुभाव वाढविणारी, माणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.
मंत्री श्री. भरणे म्हणाले,टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक उर्जा मिळते. इथं मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणी, एनर्जी ड्रिंक्स, रिलिफ स्प्रे, फळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहे, याची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.
What's Your Reaction?