बारामतीत युगेंद्र पवारांनी केली नुकसानीची पाहणी ! राष्ट्रवादी वेलफेअरच्या वतीने नुकसानग्रस्तांना केली मदत

May 28, 2025 - 06:33
May 28, 2025 - 06:38
 0  214
बारामतीत युगेंद्र पवारांनी केली नुकसानीची पाहणी ! राष्ट्रवादी वेलफेअरच्या वतीने नुकसानग्रस्तांना केली मदत

आय मिरर 

बारामतीत मागील चार दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.काल उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाणी केल्यानंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी शहरातील वसंतनगर, पाटस रोड, तांदुळवाडी औद्योगिक वसाहत, जळोची परिसरात भेट देऊन पाहणी करत धान्याचे वाटप देखील केले.

काटेवाडी च्या फुटलेल्या निरा डावा कॅनॉल वरून देखील युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं आहे, हे कॅनॉल ब्रिटिश कालीन आहेत, इमारती खचत आहेत खोलात जाऊन याची चौकशी करावी लागेल.

सरकारच्या वतीने अगोदरच कॅनॉलची पाहणी केली असती आढावा घेतला असता दुरुस्ती केली असती तर आज ही वेळ आमच्यावर आली नसती.

अजित पवारांसह राज्य सरकारला टोला

तर दुसरीकडे बारामती शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवरूनही योगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. काही लोक म्हणतील की सुशोभीकरण झाल आहे, काही लोक म्हणतील की ब्युटीफिकेशन झाल असेल. फक्त बारामती तर काय मी काल मुंबईत होतो मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईत ज्या मेट्रोचे उद्घाटन केलं त्या मेट्रोचे सेलिंग तिथे कोसळले आहे. हजारो कोटी रुपये तिथे मेट्रो वरती खर्च केलेत पण अजून मेट्रो काय नीट चालत नाही.फक्त बारामतीत नाही तर महाराष्ट्रात जिथे कुठे पाऊस झाला आहे तिथं आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळतेय असा टोला युगेंद्र पवार यांनी राज्य सरकारला लागावला आहे.

बारामती नगरपरिषद नालेसफाई

बारामती शहरात नगरपरिषदेने नाले केलेले आहेत पण ते कोणी स्वच्छ केलेले नाहीत. ते जर वेळीच साफ केले असते तर आज बारामतीकरांवर ही वेळ आली नसती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow