उपमुख्यमंत्री दादांच्या राजकीय कारकीर्दीची इंदापूरातून सुरवात,त्यांचे इंदापूरवर जास्त प्रेम - सुनेत्रा पवार

आय मिरर(देवा राखुंडे)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द इंदापूर तालुक्यापासून सुरू झाली आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदावर संधी मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. इंदापूरच्या विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. यामुळे त्यांचे इंदापूर वर जास्त प्रेम आहे. त्यांना ज्या पद्धतीने आपण साथ दिली अशीच यापुढेही द्यावी अशी भावनिक साथ बारामती टेक्सटाईल पार्कच्या उपाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी घातली.
तिथीनुसार शिवजयंती गुरुवारी 28 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांच्या गढीवर शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.
सुरुवातीला त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत चांदशाहवली बाबाच्या दर्ग्यात जाऊन चादर चढवून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रताप पाटील,श्रीमंत ढोले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,सचिन सपकळ,दीपक जाधव,गजानन गवळी, पोपट पवार ,अतुल शेटे, रमेश शिंदे ,आरपीआयचे शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे,डी.एन. जगताप, शिवाजीराव तरंगे,संग्रामसिंह पाटील ,विठ्ठल ननवरे ,संदेश देवकर, बाळासाहेब व्यवहारे, सतीश पांढरे ,महादेव चव्हाण ,हमीद अत्तार, अहमदरजा सय्यद,ॲड.शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीला ऐतिहासिक वारसा वारसा आहे.
इंदापूर तालुक्याचे शिव आणि काटेवाडी हे जवळजवळ आहेत त्यामुळे आपले नाते शिवथडीचे नाते आहे.इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी जो इंदापूर साठी निधी दिला आहे तो पाहिल्यानंतर असे वाटते की अजित पवारांचे इंदापूर वर जास्तीचे प्रेम आहे.भीमा नदीवरील शिरसोडी ते कुगाव हा पुणे- सोलापूर जिल्ह्याला जोडणारा पूल बांधण्यासाठी तब्बल 396 कोटी रुपये पवार यांनी मंजूर केले असून दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सर्व सहकारी राज्याच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे. त्यांना साथ देण्यासाठी व विकासाचा महामेरू पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा बाळगते.
What's Your Reaction?






