शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उजनी धरण 50 टक्क्यापेक्षा अधिक भरलं…
आय मिरर
पुणे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरणातील पाणीसाठा 50 टक्क्याहून अधिक झाला आहे. उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज बुधवार सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे प्लस 51 पूर्णांक 50 टक्के झालं असून उजनीत एकूण 91 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.आता उजनी शंभर टक्के भरण्यासाठी केवळ 26 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
शुक्रवारी 26 जुलै रोजी उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये आले होते. अवघ्या पाच दिवसात उजनीत 27 पूर्णांक 59 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला असून यंदाच्या पावसाळ्यात आज अखेर पर्यंत उजनीत एकूण 48 टीएमसी पाणी साठा जमा झालाय.सध्या उजनीत दौंड बंधाऱ्यातून 20 हजार 852 क्युसेक इतका विसर्ग येतोय.
What's Your Reaction?