शाळेची बस उलटली ! भीषण अपघातात 6 मुलांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Apr 11, 2024 - 16:47
Apr 11, 2024 - 16:50
 0  3176
शाळेची बस उलटली ! भीषण अपघातात 6 मुलांचा मृत्यू, अनेकजण जखमी

आय मिरर

हरियाणातील उन्हानी गावाजवळ शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. दुर्घटनेमध्ये अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

हरियाणातील नारनौल शहरामध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये सहा मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 12 मुले गंभीर जखमी झाले आहेत. नारनौल शहरामधील उनहानी गावाजवळ जी.एल.पब्लिक शाळेच्या बसला अपघात झाला. पण ईद सणानिमित्त शासकीय सुटी असतानाही शाळा का सुरू होती? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचे फिटनेस सर्टिफिकेटही कालबाह्य झाले होते. फिटनेस सर्टिफिकेटशिवाय बसमधून मुलांना शाळेत नेण्याचे काम सुरू होते. तसेच चालक मद्यधुंद अवस्थेतच गाडी चालवत होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow