धक्कादायक ! पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Apr 11, 2024 - 17:38
Apr 11, 2024 - 17:39
 0  858
धक्कादायक ! पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

आय मिरर

बांधकाम साईटवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. लोणी काळभोर परिसरातील रायवाडी रोडवर गणेश खेडेकर यांच्या बांधकाम साईटवर ६ एप्रिलला सकाळी पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.

प्रिन्स चंद्रकुमार कोशले (२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार बापू शिवराम माने (४४, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार विजय नथु जाधव यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रायवाडी रोडवर गणेश खेडेकर यांचे बांधकाम सुरु आहे. आरोपी बापू माने बांधकाम साईटवर ठेकेदार म्हणून काम करतो. मानेने घराच्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करताना दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे अंडरग्राऊंड पाण्याची टाकी बांधली. मात्र पाण्याच्या टाकीवर झाकण टाकले नाही. मृत प्रिन्स खेळत असताना झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. टाकीत असलेल्या पाण्यात बुडून प्रिन्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास उपनिरीक्षक तरटे करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow