माने आऊट जगदाळे इन ? आप्पासाहेब घेणार कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मोठा निर्णय

आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आप्पासाहेब जगदाळे यांनी आज ( दि.१०) पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी सोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
यावेळी माध्यमांंनी आप्पासाहेब जगदाळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले या पूर्वी खा शरद पवार यांनी भेटीचे आमंत्रण दिले होते, परंतु माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला जाता आले नाही. आज भेट झाली असून लोकसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे, कार्यकर्त्यासमवेत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
मात्र मागील महिन्यात आपण अजित पवार यांची ही भेट घेतली होती. आजच्या भेटीत शरद पवार यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली. इंदापूर तालुका, बारामती लोकसभा मतदार संघातील विद्यमान परिस्थितीबाबत बोलणे झाले.
यावेळी बोलताना जगदाळे म्हणाले नेहमीच साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आगामी काळात काय भूमिका घ्यायची यासंदर्भात मी निर्णय घेणार आहे काही प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलणं झाले असून काहींशी बोलणं अद्याप बाकी आहे यानंतरच आपला निर्णय जाहीर करू.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या विभागणीनंतर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या गटात गेले. गेल्या आठवड्यात शरद पवार गटातील विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार प्रवीण माने देखील देवेंद्र फडणवीस यांचे चहापान करुन अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणा-या आप्पासाहेब जगदाळे यांना आत्ता मार्ग ख-या अर्थाने मोकळा झाला आहे. या संदर्भात विचारणा केल्यानंतर आपणास मार्ग नेहेमी मोकळाच होता. मी ज्या गोष्टी करतो त्या कधी चोरुन लपून करत नाही, असे ते म्हणाले.
What's Your Reaction?






