पुणं गेलं खड्ड्यात ! जमीन खचली खड्डा पडला आणि…

Sep 21, 2024 - 07:01
 0  294
पुणं गेलं खड्ड्यात ! जमीन खचली खड्डा पडला आणि…

आय मिरर

पुण्यात एक धावता ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना शुक्रवारी दि.20 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. पुण्याच्या समाधान चौकातील रोडच्या मध्यभागी असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात हा ट्रक पडून दुर्घटना घडली. अखेर तीन ते साडे तीन तासानंतर हा टँकर बाहेर काढण्यात यश आले आहे.

पुण्याच्या समाधान चौक जवळ सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात पुणे महापालिकेचा ट्रक ड्रेनेज साफ करण्यासाठी गेला होता. यावेळी ट्रक मागे घेतला जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रक तसाच त्या खड्ड्यात जावून कोसळला गेला.दोन क्रेनच्या सहाय्याने तीन तासांनंतर तो बाहेर काढला गेला. 

पुणे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टाच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली गेली त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात महापालिकेचा एक टँकर पडला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow