चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार

Jul 15, 2024 - 07:07
 0  465
चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार

आय मिरर

चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही. आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो. कुणी गैरसमज निर्माण केले तर आमचा महायुतीवर विश्वास आहे असं सांगा, असं म्हणत अजित पवार यांनी बारामतीकरांना विश्वास दिला. 

रविवारी १४ जुलै रोजी बारामती शहरातील मिशन हायस्कूलच्या मैदानावरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा महा जन सन्मान मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार यासह नऊ मंत्री आणि मोठा लवाजमा उपस्थित होता.यावेळी अजित पवार बोलत होते.

या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या योजनाचा पाढा अजित पवारांनी वाचला. विरोधकांकडून सरकारी योजनांवर होणाऱ्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. विधानपरिषदेच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा खोटा प्रचार 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्ही विकासावर बोलत होते. तर विरोधक खोटा प्रचार करत होते. त्यावेळी वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न झाला. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आम्ही इंदू मिलमध्ये उभारत आहोत. संविधान दिन साजरा केला. मात्र हे 400 पार झाले तर संविधान बदलतील असा खोटा प्रचार आमच्याविरोधात (महायुती) करण्यात आला.

महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होणार नाही

शाहु-फुल-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ असा शब्द मी देतो, असं अजित पवार यांनी म्हटलं. सत्ता येत सत्ता जाते. सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाहीत. मिळालेल्या सत्तेचा वापर गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी झाला पाहिजे. कालच मी अमित शाह यांना भेटलो.  आरक्षणाबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही,  असं अजित पवार यांनी म्हटलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow