गिरवीत बंधाऱ्याचा भरावा फुटला ! अंकिता पाटील ठाकरेंकडून पाहणी
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील गिरवी येथील निरा नदीवरील बंधाऱ्याचा भरावा पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तब्बल तिसऱ्यांदा फुटलाय. पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी या बंधाऱ्याची पाहणी केली असून या फुटलेल्या बंधाऱ्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे तातडीने बांधायचे दुरुस्ती करावी अशी मागणी अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे.
गिरवी-गणेशगाव या नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या भरावास पुराच्या पाण्याने शुक्रवारी (दि.26) मोठे भागदाड पडले आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्ती संदर्भात अंकिता पाटील ठाकरे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
या बंधाऱ्याचा भरावा वाहून गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निरेला आलेल्या पुराच्या पाण्याने बंधाऱ्याच्या गिरवी गावच्या बाजूच्या भरावास मोठे भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याचा भराव वाहून जाण्याची ही तिसरी वेळ असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी अंकिता पाटील ठाकरे यांना सांगितले.
बंधाऱ्याच्या भरावास पडलेल्या मोठ्या भगदाडाची तातडीने दुरुस्ती केली नाही, तर मात्र हा बंधारा पाण्याभोवी कोरडा राहिल्यास बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील पिके धोक्यात येणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
या बंधाऱ्याच्या तातडीने दुरुस्ती संदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी दिली. या पाहणी प्रसंगी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?