दिवाळी पाडव्याला दादा ताई साहेब आले एकत्र ! शरद पवार म्हणतात एकत्र येण्याची आमच्या कुटुंबाची पद्धत
आय मिरर
दिवाळी पाडव्याला गोविंदबागेत सर्व पवार कुटुंब एकत्र आलेलं सगळ्यांनी बघितलं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पवार कुटूंबियांची ही पहिलीच दिवाळी. यावेळी अजित पवार गोविंदबागेत येतील की नाही?अशा अंगाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली दिसून आली होती परंतु अजित पवार यांनी गोविंदबागेत हजेरी नोंदवून या चर्चेला पूर्णविराम लावला.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणणारी गोष्ट म्हणजे अजित पवार यांनी केलेले बंड आणि त्या बंडासोबत ते शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. यानंतर दिवाळीला पवार कुटूंबियांच चित्र कसं असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. नेहमीप्रमाणे पवार कुटुंबियांची दिवाळी एकत्र पार पडली.
या सर्व पार्श्वभूमीवर बोलतांना शरद पवार म्हणाले की “आमच्या परिवाराची सुमारे 60-70 वर्षापासूनची ही एक पद्धत आहे, की दिवाळीला सगळ्यांनी बारामतीत यायच आणि तीन दिवस एकत्र राहायचं. यावेळी आम्हा सर्वांच एकत्र येणं यात कोणताही राजकीय लवलेश नव्हता तर त्यात निव्वळ कौटूंबिक लवलेश होता.” असे प्रतिपादन शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
What's Your Reaction?