बिग ब्रेकिंग | दौंड बंधाऱ्यातून उजनीत येणारा विसर्ग वाढला,लवकरच उजनी धरण येणार मायनस मधून प्लस मध्ये
आय मिरर
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट माथ्यावर पाऊस झाल्याने दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात येणारा विसर्ग वाढला आहे.सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 12524 क्युसेक इतका विसर्ग येत आहे. त्यामुळे उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
उजनी धरणाची सध्या एकूण पाणी पातळी 45 पूर्णांक 70 टीएमसी इतकी झाली असली तरी उजनी धरण सध्य स्थितीत वजा 33 टक्के इतकं आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट माथ्यावर असाच पाऊस राहिल्यास लवकरच उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये येण्याची चिन्ह आहेत.
What's Your Reaction?