इंदापूर मधील या डॉक्टरचं पत्र सोशल मीडियात होतयं व्हायरल, काय लिहलयं पत्र

Apr 18, 2024 - 09:14
Apr 18, 2024 - 09:50
 0  5471
इंदापूर मधील या डॉक्टरचं पत्र सोशल मीडियात होतयं व्हायरल, काय लिहलयं पत्र

आय मिरर(देवा राखुंडे) 

सध्या लोकसभेचे घमासान सुरू आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर असून सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लढत आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले दिवसेंदिवस राजकारणात ट्विस्ट येत असून पुण्याच्या इंदापूर शहरातील एका डॉक्टरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल एक पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियात वायरल झाले आहे. आयुर्वेदाचार्य डॉक्टर संतोष नगरे यांनी हे पत्र लिहिलं असून त्यातून त्यांनी अजित पवारांचा काम करण्याचा अचूक हातकंडा मांडला असून सुनेत्रा पवारांना का मतदान करावयाचे याचं नेमकं कारण मांडत इंदापूरकरांना आवाहन केलयं.

डॉक्टर संतोष नगरे यांचं पत्र जसच्या तसं…

जय श्रीराम

विकासरत्न अजित दादा पवार 

लेखक - डॉक्टर संतोष भगवान नागरे आयुर्वेदाचार्य,इंदापूर

अजित दादा हे गेली 30 वर्षापासून विकास पुरुष म्हणून ख्याती आहे. संधी मिळाल्यावर त्याचे सोनं कसे करायचे हे दादांकडून शिकावं. संधी अनेक लोकांना मिळते त्याचे सोने करणारा एखादाच असतो. 

पुण्याला पर्याय म्हणून सध्या बारामतीचा विकास सुरू आहे. एम बी बी एस, बी ए एम एस कॉलेज,प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज याशिवाय माळेगाव आणि बारामती मधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शैक्षणिक संकुल, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये जनावरांचे बाजार फळांचे बाजार यांची चांगल्या पद्धतीने विक्री होते हे सर्व अजित दादांमुळे शक्य झाले.

बारामती एक वेल प्लॅनेट सिटी असून डिव्हायडर झाडे त्यांची प्रॉपर रचना करण्यात आली आहे. एमआयडीसी च विजन असून बारामतीत एमआयडीसी सुरू करून नवनवीन कंपन्यांना आणून औद्योगिक स्थैर्य दिले. कोणतीही खंडणी दमदाटी होऊ न देता त्या कंपन्यांवर दादांचे कटाक्षाने लक्ष आहे. इतर ठिकाणी उदाहरण म्हणून पाहिले तर रांजणगाव मध्ये दमदाटी होऊन आणि कंपन्या निघून गेल्या असेही या पत्रात नमूद केलेय.बारामती एसटी स्टँड पन्नास कोटीचे आहे हे महाराष्ट्रातील आदर्श एसटी स्टँड आहे.

खडकवासला भाटगर पाणी नियोजनबद्ध पद्धतीने दौंड इंदापूर बारामतीला वेळेवर पुरवण्याचा कटाक्ष दादांचा असतो. भवानीनगर सोमेश्वर माळेगाव ह्यात तीन कारखान्यांना उत्कृष्ट दर मिळतो व त्यावर दादांचे बारकाईने लक्ष असते.दूध उत्पादनामध्ये नंदन दूध चांगल्या प्रकारे काम करते.शेतकऱ्यांना वाजवी दरात खते बियाणे जनावरांची औषधे हे बारामती खरेदी विक्री संघाकडून मिळते,हे केवळ दादांमुळेच. बारामती व्यापार पेठ वाढवण्यामागे दादांचा मोठा हातभार आहे. उदाहरणार्थ राजस्थान छाझेड,मोथा, इत्यादी कापड दुकाने व्यवस्थित चालवण्यासाठी कोणतीही गुंडागर्दी खंडणी सारखा प्रकार होऊ न देणे हे दादांचे शिस्तबद्ध काम आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांना सुलभ अशा पद्धतीचे वातावरण लाभल्यामुळे व्यापार वाढला आहे. फोर्ड,टोयोटा,मारुती, हुंडाई तसेच महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्यांची शोरूम्स् बारामतीत आहेत. मासळी बाजार आणि भाजी बाजार हा खूप अद्यावत पद्धतीने चालतो.

इंदापूरच्या विकासमागे दादांचा हातभार…

शिरसोडी कुगाव या पुलासाठी 382 कोटी रुपये दादांमुळे मंजूर झाले. इंदापूर तालुक्यात दादांच्या विचाराचा आमदार असल्यामुळे शंभर कोटीचा बायपास रिंग रोड झाला.रस्ते गटारीची कामी झाली हे दादांनी इंदापूर जास्त लक्ष दिले. तालुक्यामध्ये भले मामांच्या मागणीमुळे सर्व गावात 90 टक्के तरी चकाचक डांबरीकरण झाले आहे. इंदापूरचा विकास हा केवळ दादांमुळे झालाय. नगरपालिका इमारत, न्यायालयाची इमारत, सार्वजनिक बांधकाम इमारत या सर्व आमदार मामांच्या माध्यमातून झाल्या आणि यासाठी दादांनी निधी उपलब्ध करून दिला.मालोजीराजे गडीसाठी ही 37.28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. इंदापुरातील हायवे रस्ता फुटपाथ चे दिव्यांसह काम झाले यासाठी अंदाजे आठ कोटी रुपये खर्च आला आणि हे काम मामांच्या माध्यमातून दादांनी केले. मालोजीराजे चौक हे श्रेय मामांचे आणि दादांचे आहे. म्हणून इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विचार करणे गरजेचे आहे.अजित दादा आहे बाहेरून कडक व्यक्तिमत्व असले तरी त्याशिवाय प्रशासन काम करत नाही. सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत काम करणारा माणूस इंदापूरसाठी महत्त्वपूर्ण आहे. थोडक्यात मोदी वर आणि बारामतीमध्ये सुनिता ताई पवार हेच करावे लागेल. काट्याची टक्कर आहे विचारपूर्वक मतदान करा.जय श्रीराम जय हिंद जय भारत…एक इंदापूरकर नागरिक… संतोष नगरे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow